• गणपतीचे हत्तीचे मस्तक
    Feb 8 2023
    गणेशपुराणात शौनक ऋषी सूतांना गणेशाचा गजानन कसा झाला याची कथा विचारतात. सूत मुनी त्यांना तीच कथा ऐकवतात जी नारायणाने नारद मुनींना ऐकवली होती. एकदा देवराज इंद्र पुष्पभद्रा नदीच्या शांत आणि सुंदर किनारी उभे होते. त्या निर्मनुष्य क्षेत्रात अनेक सुंदर फुले आणि झाडे लावलेली होती.
    Más Menos
    5 m
  • स्यमंतक मण्याची कहाणी
    Feb 1 2023
    श्रोतेहो, सूत्रधार मध्ये आज आपण स्यमंतक मण्याबद्दलची कथा ऐकूया. स्यमंतक मणि हे असं एक रत्न होतं. ज्यामध्ये स्वतः भगवान सूर्यदेव यांचं तेज समाविष्ट झालेलं होतं. हा मणी ज्या राज्यात असेल ते राज्य धनधान्याने समृद्ध असे. हा मणी आपल्याचजवळ असावा असं प्रत्येकाला वाटे. एकदा साक्षात भगवान श्रीकृष्णालाही स्यमंतक मणी मिळवण्याची इच्छा झाली. बालपणी गोपिकांकडून लोणी चोरून खाणारा श्रीकृष्ण माखनचोर म्हणून ओळखला जाई. परंतु यावेळी भगवान श्रीकृष्णावर जो आरोप केला गेला तो गंमत म्हणून केलेल्या चोरीबद्दल नव्हता बरं का!
    Más Menos
    11 m
  • सत्यवतीचा विवाह
    Jan 25 2023
    एके दिवश महाराज शान्तनु गंगा नदीच्या काठी विहार करत होते अणि त्यांनी पाहिले की एक किशोर वयाच्या मुलाने आपल्या धनुर्विद्येने गंगेचा प्रवाह रोखून धरला होता. महाराज शान्तनु हे पाहून आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी त्याला त्याचा परिचय विचारला. त्याच वेळी देवी गंगेने तेथे प्रकट होऊन शान्तनु यांना त्या मुलाचा परिचय दिला. ती म्हणाली "महाराज! आज मी तुमचा पुत्र देवव्रत तुम्हाला सोपवते आहे. याने ब्रह्मर्षि वसिष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली वेदांचे अध्ययन केलं आहे आणि धनुर्विदयेची कला स्वतः भगवान परशुरामांकडून मिळवली आहे. हा आपला पुत्र कुरुवंशाचा उत्तराधिकारी होण्यासाठी अगदी योग्य आहे.” असं म्हणून देवी गंगा पाण्यात विलीन झाली आणि महाराज शान्तनु यांनी आपल्या पुत्राला आपल्याबरोबर महालात आणलं. देवव्रत सर्व प्रकारच्या विद्यांमध्ये निपुण होता आणि महाराज शान्तनुना आपल्या पुत्राविषयी खूप अभिमान होता.
    Más Menos
    10 m
  • परिजात हरण - भाग 2
    Jan 18 2023
    द्वारकेतला पारिजात वृक्ष कथेच्या पहिल्या भागात आपण पाहिलं की नारदमुनींनी द्वारकेत आल्यावर एकामागोमाग एक अशा प्रकारे घटना घडवल्या, की ज्यामुळे भगवान श्रीकृष्णानी सत्यभामेला अमरावतीहून पारिजातकाचा वृक्ष आणून तिच्या बागेत लावण्याचं वचन दिलं. श्रीकृष्णाच्या परिजात-हरण लीलेच्या या भागात आपण जाणून घेऊया की श्रीकृष्णांनी कसं आपल्या वचनाचं पालन केलं. भगवान श्रीकृष्णांचा निरोप घेऊन नारद मुनी महादेवाच्या सन्मानार्थ स्वर्गात आयोजित केलेल्या एका समारंभात गेले. तिथे इतर देव, गंधर्व, अप्सरा आणि देवर्षी यांच्याबरोबर नारदमुनी उमा-महेश्वरांची आराधना करू लागले.
    Más Menos
    16 m
  • पारिजात हरण - भाग 1
    Jan 11 2023
    द्वारकेत आले नारद मुनी एकदा भगवान श्रीकृष्ण आपली पत्नी रुक्मिणी हिच्या समवेत रैवतक पर्वतावर गेले होते. तिथे देवी रुक्मिणीने एका समारोहाचं आयोजन केलं आणि भगवान श्रीकृष्ण स्वतः अतिथींचं स्वागत सत्कार करू लागले. भगवान श्रीकृष्णांना अतिथींच्या आदरातिथ्यात काही कमी पडू द्यायचं नव्हतं. या भव्य समारंभात त्यांच्या पट्टराण्या आणि राण्यांच्या दास्यासुद्धा सहभागी झाल्या होत्या. जेव्हा भगवान श्रीकृष्ण देवी रुक्मिणी सोबत बसले तेव्हा तिथे नारदमुनी आले. भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणीनं नारदांना अभिवादन केलं आणि आपल्या जवळच्या स्थानावर बसवलं.
    Más Menos
    13 m
  • कावळा चाले हंसाची चाल
    Jan 4 2023
    द्रोणाचार्यांच्या मृत्यू पश्चात दुर्योधनाने कौरवांच्या सेनेचा सेनापती म्हणून कर्णाची नियुक्ती केली. कर्णाने दुर्योधनाला शब्द दिला की तो अर्जुनाचा वध करेल... आणि युद्धात दुर्योधनाचा विजय निश्चित करेल. आपण अर्जुनापेक्षा सर्वतोपरि कसे श्रेष्ठ आहोत हे तो दुर्योधनाला पटवून देत होता. मात्र कर्ण म्हणाला, की अर्जुनाकडे सारथ्याच्या रूपात कृष्ण आहे... मग त्याने प्रस्ताव मांडला की जर शल्य त्याचा सारथी बनला तर तो अर्जुनाच्या बरोबरीचा होईल. दुर्योधनाने शल्याच्या घोडे हाकण्याच्या कौशल्याची प्रशंसा केली केली.... तसेच तो असेही म्हणाला की या बाबतीत तो कृष्णाच्या बरोबरीचा आहे. आणि त्याने शल्याला कर्णाचा सारथी बनवण्याचे आश्वासन दिले. शल्याने कर्णाचा रथ चालवत असताना त्याला एक गोष्ट सांगितली... ती अशी...
    Más Menos
    8 m
  • सोनेरी मुंगूस
    Dec 28 2022
    कुरुक्षेत्राचं युद्ध जिंकल्यानंतर, युधिष्ठिर हस्तिनापुरीचा राजा झाला आणि त्याने अश्वमेध यज्ञ करण्याचा निर्णय घेतला. यज्ञ अत्यंत संस्मर्णीय आणि व्यापक स्वरूपाचा झाला ज्याची किर्ति चारी दिशांना पसरली. यज्ञ वैदिक अनुष्ठाना नुसार विद्वान ब्राम्हणांच्या मार्गदर्शनात पार पडला आणि दानधर्मही त्याच तोडीने केला गेला जसा आजवर विश्वात कुणीही पहिला नसेल. यज्ञाच्या शेवटी एक मुंगूस तिथे आले. ज्याच्या शरीराचा अर्धा भाग सोनेरी होता आणि अर्धा तपकिरी रंगाचा होता. मुंगूस तिथे येताच जमिनीवर पसरले आणि जोरजोरात आवाज करू लागले. त्याने तिथे असलेल्या सगळ्या ब्राम्हणांचे लक्ष आपल्याकडे खेचले आणि त्यासोबतच त्याने माणसाच्या आवाजात बोलायला सुरुवात केली. मुंगूस म्हणाले, "धर्मराज! हे दिलेलं दान एका गरीब ब्राम्हणाकडून दिल्या गेलेल्या एक किलो पिठाच्या तुलनेत काहीच नाहीये."
    Más Menos
    8 m
  • नारदमुनींच्या नावाची कथा
    Dec 21 2022
    एके दिवशी नारदमुनी मनुचा पुत्र प्रियव्रताला भेटायला गेले. प्रियव्रताने ज्ञानी ऋषी नारदांचं सन्मानानं स्वागत केलं आणि यथोचित आदरातिथ्य केलं. ज्ञान प्राप्तीच्या इच्छेपोटी त्यानं नारदमुनींना अनेक प्रश्न विचारले, पण त्याची ज्ञानर्जनाची तहान काही शमेना. त्याने नारदमुनींना प्रश्न केला"मुनिवर ! जेंव्हा काहीही घडणार असेल तेंव्हा देवांना त्याचे पूर्वानुमान असते, पण मला तुमच्याकडून अशा घटनेबद्दल जाणून घ्यायचे आहे जी अद्भुत आणि विचित्र असेल” नारदमुनींनी अगदी प्रसन्न चित्ताने स्वतःशी निगडीत एक विचित्र आणि अद्भुत घटना सांगितली ती अशी की ते साक्षात माता सावित्रीलाच ओळखू शकले नव्हते. एकदा नारदमुनी श्वेतद्वीप नावाच्या क्षेत्री गेले होते. हे स्थळ तिथल्या सुंदर सरोवराकरिता प्रसिद्ध पावले होते आणि नारदमुनी त्या सरोवराचं सौदर्य पाहण्यासाठी आतुर होते. तिथे पोचल्यावर त्यांनी पाहिलं की सरोवर कमळाच्या फुलांनी भरलेलं आहे आणि एक सुंदर स्त्री एखाद्या पुतळ्यासारखी तेथे निश्चल उभी आहे.
    Más Menos
    7 m