Episodios

  • कज्जा कचेरी
    May 13 2022
    कज्जा कचेरी एक वाचलेली गोष्ट आठवली. गोष्ट काका व पुतण्याची आहे. दोन भाऊ खेड्यातले. मोठा हुषार. शिक्षणाची आवड. शिकून मोठा अधिकारी होतो. शहरात नोकरी करतो. स्वतःचे घर बांधतो. लग्न करतो. योग्यवेळी सेवानिवृत्त होतो. त्याला एक मुलगा असतो. तो आता तरूण झालेला असतो. लहानपणापासून अधेमधे आईवडिलांबरोबर खेड्यात जात असतो. त्याचा काका त्याच्या वडिलांपेक्षा बराच लहान असतो. काकाचे शिक्षणात लक्ष नसते. वडील मात्र काकाने शिकावे म्हणून फार प्रयत्न करतात. पण काका शिक्षणापेक्षा शेतीत रमतो. वडिल शेतीसाठी होणारा खर्च त्याला पुरवीत असतात. म्हातारपणामुळे आईवडिलांचे निधन होते. मग मोठा भाऊच लहान भावाला पैसा पुरवीत असतो. त्याचे लग्नही करून देतो. लग्नानंतरही मोठा भाऊ लहान भावास पैसा पुरवीत असतो. हे सर्व मोठ्या भावाचा मुलगा पाहत असतो. ऐके दिवशी तो वडिलांना म्हणतो की, आता काकाला पैसे पाठविणे बंद करा. त्याचे वडिल कांही त्याचे ऐकत नाही. मग त्या दोघांमध्ये वादविवादाला सुरूवात होते. शेवटी कंटाळून वडिल त्याला वडिलोपार्जीत मिळकतीचे वाटण्यासंदर्भातील मुखत्यार पत्र देतात व मुलाला पाहिजे ते करण्याची मोकळीक देतात. मग हा मुलगा, काकांना वडिलोपार्जीत मिळकतीची वाटणी मागतो. पण काका त्याला स्पष्टपणे नकार देतो. मग मात्र पुतण्या काकांविरूद्ध न्यायालयात खटला दाखल करण्याची तयारी करतो. पुतण्याला शेतीची, घराची वाटणी करण्यासाठी मोजमाप घेणे, वेगवेगळे कागदपत्र जमा करण्यासाठी खेड्यात वारंवार जावे लागायचे. पहिल्यांदा तो जेंव्हा खेड्यात जातो, त्यावेळी गावात कुठे राहायचे हा प्रश्न त्याच्यासमोर येतो. पण तो गावात आल्याचे कळताच त्याचा काका स्वतः त्याला घरी घेऊन जातो. तो काकाच्या घरी पोहचल्याबरोबर त्याच्या लहानग्या चुलत भावंडानी त्याला आनंदाने मिठ्या मारल्या. मोठ्या भावाच्या आगमनाचा त्यांना खूप आनंद झाला होता. ते त्याला सोडायला तयार नव्हते. शेवटी काकूने जेवायला बोलावल्यावर त्याची सुटका झाली. मोजमापाच्या कामात त्याला काकाने सर्व मदत केली. तलाठी कार्यालय, नायब तहसीलदार कार्यालय, भूलेख कार्यालय, तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व जेथे जेथे त्याला जावे लागे किंवा काम असे तेथे तेथे काका त्याला सोबत करी व मदतही ...
    Más Menos
    10 m
  • विदुषी दुर्गा भागवतांचे शब्द लालित्य
    May 3 2022
    विदुषी दुर्गा भागवतांचे शब्द लालित्य कवी मंगेश पाडगावकरांच्या जिप्सी या काव्यसंग्रहाचे परिक्षण करतांना विदुषी दुर्गा भागवतांनी शब्दालंकार लेवऊन भाषेला कशी नटविली, सौंदर्यावती कशी बनविली याची झलक खाली देत आहे. "फक्त ती काळी अक्षरे होती आणि ती वाचणारी मी होते. काही अक्षरे पंक्तीपंक्तीनी सजीव व सशब्द झाली होती. काही कुंचल्याचा आकार धारण करून रंगीत चित्रे रेखाटीत होती. काही हिरव्या, केशरी व निळ्या रंगाचे फवारे सोडीत बसली होती. काहींची काया नाहीशी होऊन 'मातीच्या अत्तराचा' ती भपकारा वर फेकीत होती. काही तेजस्वी ठिपके होऊन आकाशात उगीचच भिरभिरत होती. काही खूप खूप मोठी होऊन नदीप्रमाणे वहात होती. ढगाप्रमाणे गर्जत होती. आणि काही हट्टी पोरांप्रमाणे फुरंगटून कोपर्‍यात बसली होती." ही झाली अक्षरांची विदुषी दुर्गा भागवतांनी यांनी रचलेली बाललीला. आता पुढे अक्षरांची शब्दफुले होऊन त्यांनी अर्थवाही, भाववाही स्वरूप धारण केल्यावर ॠचा रूपात अवतरलेल्या कवितेच्या अनुषंगाने त्या लिहितात :- "सर्वांना गती देणारे संगीतही कुठून तरी ऐकू येत होते. परिचित, मृदू, मंजुळ असे. आणि मग त्या संगीताचे काय ते भान उरले. आणि मग थोडा अलिप्तपणा पत्करून मी त्या नादप्रतीतीचे पृथक्करण करू लागले. कवितेच्या पारंपरिक गेयतेपासून पाडगावकर कटाक्षाने दूर राहत असले तरीही पारंपरिक आणि नविन छंदांनी ही कविता निनादित आली आहे. ताल व नादाचे गतीमान व पार्थिवतेतून पुलकित झालेले सुकुमार सौंदर्य त्यांच्या शब्दाशब्दाने आत्मसात केले आहे. शब्दांनीच नव्हे तर अर्थानेही मूर्त अमूर्त अशा भाववृतींनीही. या कलात्मक सुसंवादामुळेच जी निसर्गप्रतीके पाडगावकरांनी वापरली आहेत, ती केवळ रंगानी भरलेली शब्दचित्रे वाटत नाहीत. ती गेयतेनी रसरसलेली नादबिंबे आहेत. ती गेयता झुळझळणा-या पाण्यात, भरकटणा-या वा-यात, रातकिड्यांनी नादविलेल्या रात्रीच्या काळोखात, पक्ष्यांच्या बोलात, फुलपाखराच्या विभ्रमात आणि अनंत सौंदर्यप्रतिमानात रात्रंदिवस विश्वगतीचे रूप घेऊन धावत असते; अचेतन सचेतन करते, सचेतन भावान्वित करते. तीच ही विशाल निरींद्रिय गेयता पाडगावकरांनी आपल्या काव्यात भरभरून ओतली आहे. बासरी वाजवणारा आपला श्वास बासरीत ओततो तशी. केवळ गतीचाच नाद व ...
    Más Menos
    7 m
  • शब्दांचे जीवनचक्र
    May 3 2022

    शब्दांचे जीवनचक्र

    प्रा डॉ श्रीकांत तारे


    माणसांप्रमाणे शब्दांचेही जीवनचक्र असते. शब्द जन्माला येतात,जगतात व शेवटी मरुन जातात. काही शब्द शतायुषी माणसाप्रमाणे पिढ्‌यान पिढ्‌या सन्मानाने जगतात. काही शब्द अल्पायुषी ठरतात, तर काही शब्द उगाचच श्वास चालला आहे म्हणून जिवंत म्हणवले जातात, एरवी त्या शब्दांकडे सहसा कुणी लक्षही देत नाही.



    Más Menos
    13 m
  • व्यासपीठ
    Apr 30 2022
    व्यासपीठ फार पुरातन काळापासून मानवी जीवनाचा प्रवास धार्मिकतेच्या नौकेतून चाललेला आहे. संपूर्ण जीवनच त्यावेळी धार्मिकतेने व्यापलेले होते, आताही ब-याच प्रमाणात ते व्यापलेले आहे हे सर्वांनाच दिसते. धार्मिक पुराणिक कथा सांगणे, धार्मिक पुराणिक विषयावर नाटके करणे, धार्मिक पुराणिक विषयावर काव्य करणे हे त्यावेळी सहजतेने घडे व त्यातच समाजाला रुची असे. त्यातल्या त्यात सोयीचा व जनरुचीचा प्रकार कथा सांगणे हा होता. कुठेल्यातरी देवळात अशा कथा सांगणारे पुराणिक येत. त्याची माहिती लोकांना हस्तेपरहस्ते कळे. मग संध्याकाळी त्यांचा कीर्तनाचे कार्यक्रम ठरलेलाच असायचा. या कीर्तनासाठी नंतर कुठल्याही जाहिरातीची आवश्यकता नसायची कि आमंत्रणही आवश्यकता नसायची. पुराणिकबुवांसाठी एक तक्तपोस देवळात ठेवलेला असायचा. कीर्तन सुरू होण्यापूर्वी देवाची पुजा केली जायची मग पुराणिकाचाही हार घालून सत्कार केला जायचा. मगच कीर्तनाला सुरुवात केली जायची. श्रोत्यांचे ३-४ तास मग आनंदात जात. मनोरंजनाबरोबर ज्ञानाचीही लयलूट या कार्यक्रम होत असे. कालांतराने गर्दी वाढायला लागली. देवळातली जागा अपुरी पडायला लागली. टाळकरी, पेटीवाला, तब्बलजी, पुरोहित यांचेसाठी गर्दीमुळे जागा उरेनाशी झाली. त्यासाठी मंदिराबाहेर मंडप उभारण्यात येऊन पुराणिकांसाठी ३ ते ४ फुट उंचीचा तात्पुरता तक्तपोस तयार करण्यात यायचा. हा तक्तपोस श्रोतावर्गापासून थोडा दूर असायचा. संस्कृतमध्ये व्यासः म्हणजे वेगळी केलेली जागा तर पीठं म्हणजे पुरोहिताची बसण्याची जागा. यामुळे पुर्वी देवळातील कीर्तनाच्या वेळी पुराणिक बसण्याच्या तक्तपोसाला व्यासपीठ म्हटल्या जात. आताही अशा उभारलेल्या कायम स्वरूपी अथवा तात्पुरत्या स्वरुपात उभारलेल्या तक्तपोसाला व्यासपीठच संबोधण्यात येते. पण आता या व्यासपीठाचा वापर विविध कारणांसाठी करण्यात येऊ लागला आहे. त्यामुळे आता व्यासपीठाची व्याख्या सर्वसाधारणपणे विचार मांडण्याची किंवा कलाकृती सादर करण्याची एक निश्चित जागा अशी केली जाऊ शकते. व्यासपीठ या शब्दाची व्युत्त्पति मुळ संस्कृत शब्दापासून झालेली आढळते. त्यावेळी त्या शब्दाचा अर्थ वेगळा होता आणि आता बदलत्या वापरामुळे त्याच्या अर्थाची वाढलेली व्याप्ती ...
    Más Menos
    4 m
  • बनियान
    Apr 22 2022

    मराठी भाषा वाचतांना भाषेच्या शब्द-डोहात बुडी मारण्याचा एक छंद लागला आहे. अर्थात हे मी असे नेहमीच करतो असे नाही. पण ज्यावेळी करतो त्यावेळी नेहमीच जे हाताला लागते त्याने मन आश्चर्य चकित होते. साधारण एक आठवड्यापुर्वी आंघोळ झाल्यावर बनियान लवकर सापडले नव्हते. झालं हा शब्द चांगलाच डोक्यात बसला. मग झाली शोध यात्रेला सुरुवात. हा शब्द इंग्रजी, हिंदी, संस्कृत,मराठी यातुन निर्माण झाला असावा असा कयास होता. यांतही इंग्रजी, हिंदी, मराठी, संस्कृत यापैकी कुठल्या तरी शब्दांचा संकर असावा असे वाटत होते. यामुळे इंग्रजी-मराठी शब्दकोश, मराठी-इंग्रजी शब्दकोश, संस्कृत- मराठी शब्दकोश, मराठी-मराठी शब्दकोश, इंग्रजी-इंग्रजी शब्दकोश, हिंदी- मराठी शब्दकोश तसेच हाताला लागतील तेवढी पुस्तके यांची खंगाळणी केली. यातुन जी माहिती प्राप्त झाली. ती उद्बोधक होती. त्यातुन या शब्दामागे बनिया हा शब्द असल्याचे लक्षात आले. (बनिया हा शब्द हिंदी/बंगाली आहे व तो संस्कृत शब्द वाणिज्य या शब्दावरून आला आहे.) बनिया लोक अंगात जी सुती बंडी (बंडी हा देखिल संस्कृत मधून आला आहे.) घालत त्यावरून इंग्रजांनी त्याचे इंग्रजीकरण करून बनियान हा नविन शब्द निर्माण केला. गुजराथी व्यापारी पुर्वी वडाच्या झाडाखाली मंदिर बांधत. वडाच्या झाडाला इंग्रजीत Baniyan tree म्हणतात. यावरून हे लक्षात येते कि, बनिया या हिंदी/बंगाली शब्दातून बनियान असे इंग्रजीकरण केले गेले आहे. पुर्वी बनियान याला समांतर गंजिफ्राॅक हा शब्द ही वापरला जायचा. आता तो सहसा वापरला जात नाही. हा शब्द गाॅज (gauze) या इंग्रजी शब्दावरून घेतला व त्याचे मराठीकरण गंजिफ्राॅक (सच्छिद्र पातळ कापडाचा फ्राॅक) असे केले गेले. म्हणजेच बनियान हा शब्द हिंदी/ बंगालीतून, इंग्रजीत तर गंजिफ्राॅक हा शब्द इंग्रजीतून, मराठीत आला. अशी आहे ही शब्दांची हेराफेरी.

    Más Menos
    5 m
  • कलगीतुरा
    Apr 16 2022
    सरदार निंबाळकर सकाळी शिबंदीची पाहणी करण्यास निघाले. आज त्यांनी पागोट्यावर लावलेला शिरपेच सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. शिरपेचात लावलेला हिरा कोवळ्या सूर्यप्रकाशात लखलखत होता. त्याचेवर लावलेली सोन्याची कलगीचे प्रत्येक लहान लहान गोळे त्याच्या चालीमुळे हिंदकळत होते. त्यावरून परावर्तीत होणाऱ्या प्रकाशकिरणांचा लपंडावाचा खेळ मनोवेधक होता व पाहणार्‍यांची प्रसन्नता वाढवीत होता. शिबंदीची तपासणी करून सरदार निंबाळकर परत गेले तरी त्यांच्या या हलगीची चर्चा सुरूच होती. हलगी साधारणपणे तुळशीच्या मंजिरीसारखी दिसते. सरदार गायकवाड यांनी दसर्‍याचा सण आनंदाने साजरा केला. संध्याकाळी शस्रपूजनासाठी त्यांनी पेहराव चढविला. सफेद र॔गाचा रेशमी अंगरखा त्यांनी परिधान केला होता. तशाच रंगाची अचकनही घातली होती. त्यांनी केसरी रंगाचे पागोटे घातले होते. त्यावरील शिरपेचात पिवळ्या रंगाचा तुरा लावला होता. वार्‍याच्या तालावर तो भुरभुरत होता. त्यामुळे सर्वाचे लक्ष तु-याकडे जात होते. असे तुरे आपणही बर्‍याच ठिकाणी पाहिले असावेत. आताही नवरदेवाच्या फेट्यावर कधी कधी असा तुरा लावलेला आढळू शकतो. कलगी तुरा हे शब्द पगडी, फेटा वा पागोट्यावरिल शिरपेचात शोभा वाढविण्यासाठी लावायचे एक शिरोभुषण (वस्तू) आहे, हे येव्हांना आपल्या लक्षात आले असेलच. एका गावात सवाल जबाबाचा कार्यक्रम होता. पण हा कार्यक्रम धार्मिक होता. त्यामुळे श्रध्दावंतांची या कार्यक्रमाला खूप गर्दी केली. हिंदू समाजात शक्तीचे प्रतिक देवी स्वरूप मानले जाते. तर प्रकृती म्हणजे शीवाचे स्वरूप मानले जाते. त्यांच्या या गुह्य स्वरूपाचे वर्णन सवालात कवनातून केले जाते, त्याला कवनातूनच जबाब देण्यात येते. धार्मिक स्वभावाचे प्रतिभासंपन्न कलाकार यात भाग घेतात. सवाल जबाब ऐकतांना भक्त रंगून जातात. शक्ती व प्रकृतीचे विविध स्वरूपाची गुह्य व कोणती दुस-या देवतेपेक्षा किती सामर्थ्यवान याची वर्णने त्यात असत. यातून या भक्तजनांचा एकमेकांवर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न असायचा. आता हा प्रकार फारसा अस्तित्वात नाही. वास्तविक हे दोन संप्रदायांचे लोक असत. शक्ती संप्रदायाच्या भक्तांना नागेश तर प्रकृती (शीव) संप्रदायाच्या भक्तांना हरदास संबोधतात. शक्ती- ...
    Más Menos
    6 m
  • आधण
    Apr 8 2022

    आधण


    "अग, मला आज ऑफिसमध्ये लवकर जायचे आहे. आंघोळीसाठी आधण ठेवतेस काय ?" सुमारे तीसेक वर्षापुर्वी बहुतांश घरातून केंव्हाना केंव्हा अशी साद दिल्याचे ऐकू यायची. किंवा " अहो, चहासाठी आधण ठेवले आहे. या लवकर." अशी हाकोटी तर नेहमीच ऐकायला मिळायची. आताशा आधण हा शब्द कमी ऐकायला येतो. परवा मात्र हा शब्द ऐकला आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. पुर्वी हा शब्द कसा वारंवार ऐकायला मिळायचा. त्यामुळे असेल की काय, या शब्दाच्या नेमक्या अर्थाचा फारसा विचार कुणी करीत नसावे. आताही असे बरेच शब्द आहेत की, ज्यांचा आपण फारसा विचार करीत नाही. बोलतांना कितीतरी शब्द आपण सहज बोलतो, पण त्यांचा नेमका अर्थ आपल्याला माहित नसतो. कुणी तसा तो सांगितला तर त्या शब्दाच्या उत्पत्तीचे आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही. तर परवा आधण शब्द ऐकला आणि त्या शब्दाचा नेमका अर्थ काय असावा याचा विचार सहज मनात डोकावला. मला बरेच दिवसांपासून शब्दांचे नेमके अर्थ शोधण्याची खोड लागली आहे.(आता खोड या शब्दाचाही नेमका अर्थ शोधावा लागेल). मराठीमध्ये संस्कृत, हिंदी, कानडी, मल्याळम्, फारसी, अरबी, अन्य बोलीभाषा अशा अनेक भाषांमधून शब्द आले आहेत. बरेचदा मुळ भाषेतील शब्दाच्या अर्थापेक्षा वेगळा अर्थ आपण मराठीत वापरतो. कांही वेळा त्याचे अपभ्रंशीत उच्चारण आपण करतो. काहीही असो! त्यामुळे भाषा मात्र समृध्द होत जाते यांस प्रत्यावाद नसावा. अरे हो, पण तुम्ही म्हणत असाल की, त्या आधण शब्दाचं पुढे काय झाले? तर आधण हा शब्द आला आहे हिंदीतून. दहन या शब्दापासून. अदहन म्हणजे ज्याचे दहन होत नाही. पाण्याचे आधण ठेवतात. पाणी अदहन आहे. त्याची वाफ होते पण ते नष्ट होत नाही. तर अशाप्रकारे आधण हा शब्द मराठीत वापरात आला. आता मला प्रश्न पडला आहे की, दहन शब्द आला कुठून? कृपया कुणी तरी सांगाल काय.


    किरण देशपांडे

    ०३/०८/२०२१


    संकल्पना आणि आवाज - पौर्णिमा देशपांडे


    प्रस्तुती - मी Podcaster

    Más Menos
    4 m
  • पगडी, पागोटे व जिरेटोप
    Apr 1 2022
    पगडी, पागोटे व जिरेटोप जगातील पुरूषांकडून डोके झाकण्यासाठी विविध साधनांचा/वस्तुंचा वापर पूर्वपरंपार आहे. त्यांची नांवेही वेगवेगळी आढळतात .पगडी,पागोटे,फेटा अशी त्यातली कांही नांवे. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शिख, पारसी व अन्य अनेक धर्मात शुभ प्रसंगी डोके झाकणे अनिवार्य असते. स्त्रीया देखील डोक्यावर पदर, घुंगट घेतांना तसेच हॅट्स व विविध प्रकारच्या टोप्या/वस्तू वापरतांना आढळतांना दिसतात. सैन्य व पोलिस दलात तर टोप्या गणवेषाचा अविभाज्य भाग असतो. समारे ७०-८० वर्षापूर्वी पागोटे घालण्याच्या प्रकारानुसार व्यक्ती कोणत्या समाजाचा आहे ते कळायचे. वारक-यांची ओळख तर त्यांच्या टोपीमुळेच होते. स्वातंत्र्य लढ्यात तर गांधी टोपीचे योगदान फार मोठे. संघाची काळी टोपी, सावरकरांची गोल उभी काळी टोपी,आर.पी.आय.ची निळी टोपी आणि किसान आंदोलनाची हिरवी टोपी यामुळे डोक्यामधील विचारधारा डोक्यावरच्या टोपीमुळे सहज लक्षात येते. लग्न समारंभात आता फेटा बांधणे अगत्याचे झाले आहे. पगडी, पागोटे यांचा संबंध प्रतिष्ठा व आत्मसन्मानशीही जोडला जातो. पागोटे दुसर्‍या व्यक्तीच्या पायावर ठेवणे म्हणजे आत्मसन्मान त्या व्यक्तीच्या चरणी ठेवणे असे समजले जाते. पगडी उछालना या हिंदी म्हणीचा अर्थ आत्मसन्मानाचा भंग करणे असा होतो. कुणाच्या मृत्यूची बातमी कळताच डोक्यावरची टोपी काढून मृत व्यक्तीच्याप्रती सन्मान प्रगट केल्या जातो. युध्दात डोक्याला ईजा होऊ म्हणून शिरस्त्राण वापरले जाते. तर स्वयंचलित दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर सक्तीचा आहे. राजस्थानी, गुजराथी व अन्य राज्यातील पगड्या त्या त्या राज्याचे वैशिष्ट्य असतात. राजे, प्रधान मंत्री, मंत्री, सेनापती यांच्या पगड्या त्यांच्या मानाप्रमाणे असत. प्रत्येक राजाची पगडी विशेष असायची. पुण्यप्रतापी छ. शिवाजी महाराज व हिंदूह्रदयसम्राट छ. संभाजी महाराज हे जिरेटोप घालत. हे दोन्ही राजे हिंदुधर्म भूषण. सभोती संकटे वाढून ठेवलेली. गनिम केंव्हा घाला घालतील याचा नेम नाही. अष्टौप्रहर जागृत असणे व युध्दसज्ज असणे गरजेचे. त्यामुळे शिर संरक्षित असणेही महत्वाचे. पण कसे, तर इतरांच्या लक्षात येऊ न देता. यामुळे त्यांचा मुकूटही विशेष प्रकारचा. त्याचे सुप्रसिध्द नांव जिरेटोप. जिरे हा ...
    Más Menos
    6 m