• कलगीतुरा

  • Apr 16 2022
  • Length: 6 mins
  • Podcast

कलगीतुरा

  • Summary

  • सरदार निंबाळकर सकाळी शिबंदीची पाहणी करण्यास निघाले. आज त्यांनी पागोट्यावर लावलेला शिरपेच सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. शिरपेचात लावलेला हिरा कोवळ्या सूर्यप्रकाशात लखलखत होता. त्याचेवर लावलेली सोन्याची कलगीचे प्रत्येक लहान लहान गोळे त्याच्या चालीमुळे हिंदकळत होते. त्यावरून परावर्तीत होणाऱ्या प्रकाशकिरणांचा लपंडावाचा खेळ मनोवेधक होता व पाहणार्‍यांची प्रसन्नता वाढवीत होता. शिबंदीची तपासणी करून सरदार निंबाळकर परत गेले तरी त्यांच्या या हलगीची चर्चा सुरूच होती. हलगी साधारणपणे तुळशीच्या मंजिरीसारखी दिसते. सरदार गायकवाड यांनी दसर्‍याचा सण आनंदाने साजरा केला. संध्याकाळी शस्रपूजनासाठी त्यांनी पेहराव चढविला. सफेद र॔गाचा रेशमी अंगरखा त्यांनी परिधान केला होता. तशाच रंगाची अचकनही घातली होती. त्यांनी केसरी रंगाचे पागोटे घातले होते. त्यावरील शिरपेचात पिवळ्या रंगाचा तुरा लावला होता. वार्‍याच्या तालावर तो भुरभुरत होता. त्यामुळे सर्वाचे लक्ष तु-याकडे जात होते. असे तुरे आपणही बर्‍याच ठिकाणी पाहिले असावेत. आताही नवरदेवाच्या फेट्यावर कधी कधी असा तुरा लावलेला आढळू शकतो. कलगी तुरा हे शब्द पगडी, फेटा वा पागोट्यावरिल शिरपेचात शोभा वाढविण्यासाठी लावायचे एक शिरोभुषण (वस्तू) आहे, हे येव्हांना आपल्या लक्षात आले असेलच. एका गावात सवाल जबाबाचा कार्यक्रम होता. पण हा कार्यक्रम धार्मिक होता. त्यामुळे श्रध्दावंतांची या कार्यक्रमाला खूप गर्दी केली. हिंदू समाजात शक्तीचे प्रतिक देवी स्वरूप मानले जाते. तर प्रकृती म्हणजे शीवाचे स्वरूप मानले जाते. त्यांच्या या गुह्य स्वरूपाचे वर्णन सवालात कवनातून केले जाते, त्याला कवनातूनच जबाब देण्यात येते. धार्मिक स्वभावाचे प्रतिभासंपन्न कलाकार यात भाग घेतात. सवाल जबाब ऐकतांना भक्त रंगून जातात. शक्ती व प्रकृतीचे विविध स्वरूपाची गुह्य व कोणती दुस-या देवतेपेक्षा किती सामर्थ्यवान याची वर्णने त्यात असत. यातून या भक्तजनांचा एकमेकांवर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न असायचा. आता हा प्रकार फारसा अस्तित्वात नाही. वास्तविक हे दोन संप्रदायांचे लोक असत. शक्ती संप्रदायाच्या भक्तांना नागेश तर प्रकृती (शीव) संप्रदायाच्या भक्तांना हरदास संबोधतात. शक्ती- ...
    Show more Show less

What listeners say about कलगीतुरा

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.