• विदुषी दुर्गा भागवतांचे शब्द लालित्य

  • May 3 2022
  • Duración: 7 m
  • Podcast

विदुषी दुर्गा भागवतांचे शब्द लालित्य

  • Resumen

  • विदुषी दुर्गा भागवतांचे शब्द लालित्य कवी मंगेश पाडगावकरांच्या जिप्सी या काव्यसंग्रहाचे परिक्षण करतांना विदुषी दुर्गा भागवतांनी शब्दालंकार लेवऊन भाषेला कशी नटविली, सौंदर्यावती कशी बनविली याची झलक खाली देत आहे. "फक्त ती काळी अक्षरे होती आणि ती वाचणारी मी होते. काही अक्षरे पंक्तीपंक्तीनी सजीव व सशब्द झाली होती. काही कुंचल्याचा आकार धारण करून रंगीत चित्रे रेखाटीत होती. काही हिरव्या, केशरी व निळ्या रंगाचे फवारे सोडीत बसली होती. काहींची काया नाहीशी होऊन 'मातीच्या अत्तराचा' ती भपकारा वर फेकीत होती. काही तेजस्वी ठिपके होऊन आकाशात उगीचच भिरभिरत होती. काही खूप खूप मोठी होऊन नदीप्रमाणे वहात होती. ढगाप्रमाणे गर्जत होती. आणि काही हट्टी पोरांप्रमाणे फुरंगटून कोपर्‍यात बसली होती." ही झाली अक्षरांची विदुषी दुर्गा भागवतांनी यांनी रचलेली बाललीला. आता पुढे अक्षरांची शब्दफुले होऊन त्यांनी अर्थवाही, भाववाही स्वरूप धारण केल्यावर ॠचा रूपात अवतरलेल्या कवितेच्या अनुषंगाने त्या लिहितात :- "सर्वांना गती देणारे संगीतही कुठून तरी ऐकू येत होते. परिचित, मृदू, मंजुळ असे. आणि मग त्या संगीताचे काय ते भान उरले. आणि मग थोडा अलिप्तपणा पत्करून मी त्या नादप्रतीतीचे पृथक्करण करू लागले. कवितेच्या पारंपरिक गेयतेपासून पाडगावकर कटाक्षाने दूर राहत असले तरीही पारंपरिक आणि नविन छंदांनी ही कविता निनादित आली आहे. ताल व नादाचे गतीमान व पार्थिवतेतून पुलकित झालेले सुकुमार सौंदर्य त्यांच्या शब्दाशब्दाने आत्मसात केले आहे. शब्दांनीच नव्हे तर अर्थानेही मूर्त अमूर्त अशा भाववृतींनीही. या कलात्मक सुसंवादामुळेच जी निसर्गप्रतीके पाडगावकरांनी वापरली आहेत, ती केवळ रंगानी भरलेली शब्दचित्रे वाटत नाहीत. ती गेयतेनी रसरसलेली नादबिंबे आहेत. ती गेयता झुळझळणा-या पाण्यात, भरकटणा-या वा-यात, रातकिड्यांनी नादविलेल्या रात्रीच्या काळोखात, पक्ष्यांच्या बोलात, फुलपाखराच्या विभ्रमात आणि अनंत सौंदर्यप्रतिमानात रात्रंदिवस विश्वगतीचे रूप घेऊन धावत असते; अचेतन सचेतन करते, सचेतन भावान्वित करते. तीच ही विशाल निरींद्रिय गेयता पाडगावकरांनी आपल्या काव्यात भरभरून ओतली आहे. बासरी वाजवणारा आपला श्वास बासरीत ओततो तशी. केवळ गतीचाच नाद व ...
    Más Menos

Lo que los oyentes dicen sobre विदुषी दुर्गा भागवतांचे शब्द लालित्य

Calificaciones medias de los clientes

Reseñas - Selecciona las pestañas a continuación para cambiar el origen de las reseñas.