• Episode no. 7 | पुण्यातील पारंपारिक बाजारपेठा
    May 10 2023

    प्रत्येक शहराचं असं एक वैशिष्ट्य असतं. एक बाजारपेठ असते पण पुणे शहरात प्रत्येक गोष्टीसाठी एक बाजारपेठ आहे हे पुण्याचं वैशिष्ट्य पुण्यामध्ये असलेली मंडई, तुळशीबाग या व्यतिरिक्त अनेक पारंपारिक बाजारपेठा पेशवाईच्या काळापासून आहेत. आजच्या ऑनलाईन युगामध्ये देखील या बाजारपेठा घट्ट पाय रोवून उभ्या आहेत. जुना बाजार, तांबट आजी, भांडी आळी, बोंबीलयान ह्या त्यापैकीं काही आहेत.आजच्या भागात याच बाजारपेठांबद्दल जाणून घेऊया.MH12 Unexplored | पुण्यातील पारंपारिक बाजारपेठा.

    Show more Show less
    9 mins
  • Episode No 8| पुण्याची समृद्ध खाद्यसंस्कृती
    May 8 2023

    प्रत्येक राज्याची, शहराची एक खाद्यसंस्कृती असते. ही खाद्यसंस्कृती त्या त्या ठिकाणाची ओळख बनते. चेहरा बनते. तिथे लोकांप्रमाणे, त्यांच्या आवडीप्रमाणे, वातावरणाप्रमाणे ही खाद्यसंस्कृती अद्यावत होत जाते. खाद्य संस्कृती ही तेथील लोकांच्या खाण्यापिण्यावर परिणाम तर करतेच पण येणाऱ्या पाहुण्यांनाही शहराबद्दल कुतूहल निर्माण करते, आपुलकी निर्माण करते.

    अशीच पुण्याची एक खाद्यसंस्कृती आहे. पुण्यामध्ये खाण्यासाठी प्रसिद्ध असलेले वेगवेगळे ठिकाणं, हॉटेल्स, अमृततुल्ये याची माहिती आपण आजच्या भागातून जाणून घेणार आहोत. तर ऐकूया MH12 Unexplored पॉडकास्ट सिरीजचा आठवा एपिसोड 'पुण्याची समृद्ध खाद्यसंस्कृती'...

    Show more Show less
    10 mins
  • Episode No 6 पुण्यातील गणेशोत्सव आ्णि इतर अपरिचीत गणपती
    Apr 27 2023

    पुणे जसं जगात भारी आहे, तसा पुण्यातील गणेशोत्सव देखील जगभरात प्रसिद्ध आहे. चौसष्ट कलांचा आणि चौदा विद्यांचा अधिपती असलेला गणपती बाप्पाच्या गणेशोत्सवाची सुरूवात याच पुण्यात झाली. ढोल ताशाच्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात दोन दिवस चालणाऱ्या या मिरवणूकीत मानाच्या गणपतींचा थाट आणि दगडूशेठ हलवाई गणपतीची आरास नेत्रदिपक असते.‌ याबरोबर पुण्यात अनेक अपरिचीत ऐतिहासिक गणेश मंदिरं आहेत. आजच्या या एपिसोडमध्ये पुण्यातील या सर्व गणपतींचा माहिमा आणि त्यांची वैशिष्ट्ये ऐकूया...

    Show more Show less
    9 mins
  • Episode No 5 | जगभरात गाजलेले आणि नावाजलेले पुण्यातील फेस्टिवल
    Apr 25 2023

    पुणे शहर हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं आणि शहराला ही सांस्कृतिक ओळख देणारे इथले हे फेस्टिवस देखील जगभरात प्रसिद्ध आहेत.

    आजच्या भागात आपण पुण्यातले वेगवेगळे फेस्टिवल आणि त्यांच्या आठवणी, इतिहास जाणून घेणार आहोत चला तर मग ऐकूया पुण्यातले नावाजलेले आणि जगभरात गाजलेले हे पुण्यातील फेस्टिवल

    Show more Show less
    9 mins
  • Episode No 4 | पेशवेकालीन पुण्याची पाणीव्यवस्था आणि बिनचुक पत्ता सांगणारे "हौद"
    Apr 24 2023

    पेशवाईने पुण्याला खऱ्या अर्थाने समृद्ध केले. पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी आखलेल्या अनेक उपाययोजनांपैकी एक म्हणजे हौदाद्वारे पाणीपुरवठा. त्या काळी कात्रज तलावातून संपूर्ण पुण्याची तहान भागवणारे हे हौद.

    ज्यांचा वापर आपण अनेक वर्ष पाण्यासाठी तर केलाच आहे पण एखाद्या ठिकाणाचा बिनचूक पत्ता सांगण्यासाठीही केला आहे. ती वास्तू आपल्या परिसराची ओळख बनली आहे. फडके हौद, काळा हौद, पंच हौद असे हे पुण्यातील वेगवेगळे हौद. आता मात्र काही हौद फक्त नावापुरती ओळख धरून आहेत तर आजच्या एपिसोडमध्ये या हौदांचा इतिहास आणि त्यांच्या काही आठवणी ऐकूया.

    Show more Show less
    9 mins
  • Episode No 3 | पुणे या नावामागचा इतिहास
    Mar 30 2023

    पुणे हे नाव जगात भारी तर आहेच पण हे शहराला नाव पडलं तरी कसं ? अगदी इ.स. ९६० साली 'पूनकदेश' असा सुरू झालेला पुण्याचा प्रवास पुनवडी, पुण्यनगरी, मुहियाबाद ते पुणे असा झाला आहे. या नावामागे पुण्येश्वर महादेवाचाही काही संबंध आहे का ? हे आपल्या MH12 Unexplored पॉडकास्ट सिरीजच्या आजच्या तिसऱ्या ऐपिसोडमध्ये 'पुणे या नावामागचा इतिहास' जाणून घेणार आहोत.

    Show more Show less
    11 mins
  • Episode 2 ; गोष्ट पुण्यातील पुलांची
    Mar 20 2023

    प्रत्येक पुणेकरांसाठी त्यांचे नदीवरील पूल फार खास आहेत. त्या पुलांवर घालवलेले अविस्मरणीय क्षण, रम्य सायंकाळ, कोसळणाऱ्या धारांसोबतच्या पहिल्या प्रेमाच्या आठवणी आणि पावसाळ्यात ती तुडुंब वाहणारी नदी बघण्यासाठी केलेली गर्दी अशा अनेक आठवणींचा साक्षीदार असलेले हे पुण्यातील पूल कसे बनवले गेले, त्यांची माहिती व त्यांचा इतिहास आजच्या आपल्या एपिसोडमधून जाणून घेऊया‌.

    Show more Show less
    7 mins
  • Episode 1 | पुण्यातील 'गेटच्या' नावांमागचा इतिहास
    Mar 11 2023

    पुण्यात अनेक 'गेट' या नावाने प्रसिद्ध असलेली ठिकाणं आहेत.उदा, फडगेट, स्वारगेट. तर या प्रवेशद्वारे नसलेल्या गेटचा नक्की इतिहास काय? का एवढी गेट पुण्यात आहेत हेच आजच्या एपिसोड मधून जाणून घेऊया.

    Show more Show less
    7 mins