• पंचतंत्रातील गोष्टी Panchatantratil Ghoshti

  • By: Sutradhar
  • Podcast

पंचतंत्रातील गोष्टी Panchatantratil Ghoshti  By  cover art

पंचतंत्रातील गोष्टी Panchatantratil Ghoshti

By: Sutradhar
  • Summary

  • आजपासून साधारण दोन हजार वर्षांपूर्वी भारताच्या दक्षिणेला महिलारोप्य नावाचं नगर होतं. जिथे अमरशक्ती नावाचा राजा राज्य करत होता. अमरशक्तीला तीन मुलं होते. बहुशक्ती, उग्रशक्ती आणि अनंतशक्ती. राजा अमरशक्ती नीतीशास्त्रात जितका निपुण होता तेवढेच त्याचे पुत्र महामूर्ख होते. लेखन-वाचनात त्यांचं मन अजिबात रमत नसे. आणि याची अमरशक्ती राजाला खूपच चिंता होती. एके दिवशी त्याने हीच चिंता आपल्या समस्त मंत्रीमंडळासमोर मंडळी आणि त्यांच्याकडे या विषयी सल्ला मागितला. राजा आपल्या मंत्र्यांना म्हणाला, "माझे पुत्र अजिबातच लेखन-वाचनात लक्ष देत नाहीत आणि त्यामुळेच त्यांना शास्त्रांचं जराही ज्ञान नाहीये. यांना असं पाहिल्यावर मला त्यांच्याबरोबर आपल्या राज्याचीही चिंता लागून राहिली आहे. तुम्ही लोक कृपा करून या समस्येवर काही उपाय सांग." सभेत उपस्थित एक मंत्री म्हणाला, "राजा! पहिल्या बारा वर्षांपर्यंत व्याकरण शिकायचं असतं. त्या नंतर मनूच्या धर्मशास्त्राचा, चाणक्यच्या अर्थशास्त्राचा आणि नंतर वात्सायनच्या कामशास्त्राचा अभ्यास केला जातो. त्यानंतर ज्ञान प्राप्ती होते." मंत्र्याचं म्हणणं ऐकून राजा म्हणाला, "मानवाचं जीवन खूपच अनिश्चित आहे आणि अशा प्रकारे सगळी शस्त्र अभ्यासण्यात, वर्ष निघून जातील. हे सारं ज्ञान प्राप्त करण्याचा काही दुसरा उपाय सांगा." तेव्हा सभेत उपस्थित सुमित नावाचा मंत्री म्हणाला, "इथे समस्त शास्त्रांतील विद्वान आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रिय असलेले विष्णुशर्मा नावाचे आचार्य राहतात. तुम्ही तुमचे पुत्र त्यांच्या ताब्यात द्या. ते अवश्य तुमच्या पुत्रांना कमी कलावधीत समस्त शास्त्रांचं ज्ञान प्रदान करतील." सुमतीचं हे बोलणं ऐकून राजाने त्वरित विष्णुशर्माला आपल्या सभेत बोलावलं आणि सांगितलं, "आचार्य! तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि माझ्या या पुत्रांना लवकरात लवकर नीतीशास्त्राचं ज्ञान प्रदान करा. जर तुम्ही असं केलं, तर मी तुम्हाला शंभर गावं पुरस्कार म्हणून भेट देईन." राजाचं बोलणं ऐकून विष्णुशर्मा म्हणाले, "राजन माझ्यासारख्या ब्राह्मणाला शंभर गावांचा काय लोभ, मला तुमचा पुरस्कार नको. मी तुमच्या पुत्रांना जरूर ज्ञान प्रदान करेन आणि पुढील सहा महिन्यांत त्यांना नीती शास्त्रात ...
    Show more Show less
activate_primeday_promo_in_buybox_DT
Episodes
  • साधू आणि उंदीर
    Dec 8 2022
    भारताच्या दक्षिणेला स्थित, महिलारोप्य नावाच्या शहराबाहेर भगवान शंकराचा एक मठ होता, जिथे ताम्रचूड नावाचा एक भिक्षू शहरातून भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत असे.त्याचं अर्ध पोट भिक्षेने भरायचं आणि अर्ध अन्न तो पोटलीमध्ये बांधून खुंटीला टांगायचा. ती अर्धी भिक्षा तो त्या मठातील सफाई कर्मचाऱ्यांना पगार म्हणून वाटायचा. अशा प्रकारे त्या मठाची देखभाल चांगली चालली होती. एके दिवशी मठाच्या आसपास राहणारे उंदीर हिरण्यक नावाच्या उंदराला म्हणाले, “आम्ही आमची भूक भागवण्यासाठी इकडे तिकडे भटकतो, आणि स्वादिष्ट अन्न तिथे खुंटीवर टांगलेल्या पोटलीमध्ये बांधलेले असते. प्रयत्न करूनही आम्ही त्या खुंटी पर्यंत पोहोचू शकत नाही. तू आम्हाला काही मदत का करत नाहीस?" आपल्या साथीदारांचं म्हणणं ऐकून हिरण्यक त्यांच्यासह मठात पोहोचला. त्याने उंच उडी घेतली. पोटलीमध्ये ठेवलेलं अन्न त्याने स्वतः खाल्लं आणि आपल्या साथीदारांनाही खाऊ घातलं. आता हे चक्र रोज सुरू झालं. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांनी पगार न मिळाल्याने मठात काम करणं बंद केलं. या सगळ्या प्रकारामुळे संन्यासी खुप नाराज झाला
    Show more Show less
    10 mins
  • लोभी कोल्हा
    Dec 1 2022
    शिथिलौ च सुबद्धौ च पततः पततो ना वा। निरीक्षितौ मया भद्रे दश वर्षाणि पक्ष च॥ ज्याच्या नशिबात लिहिलं आहे, त्याला तेच मिळतं, बघा एकट्या बैलाला मारण्याच्या आशेने कोल्ह्याला पंधरा वर्षं कसं भटकावं लागलं. एका जंगलात तीक्ष्णशृंग नावाचा बैल राहत होता, तो आपल्या शक्तीच्या आहारी गेला होता, आपल्या कळपापासून तो वेगळा झाला होता आणि एकटाच फिरत होता. तो हिरवे गवत खात असे, थंड पाणी पीत असे आणि आपल्या धारदार शिंगांनी खेळत असे. याच जंगलात एक लोभी कोल्हा सुद्धा आपल्या कोल्हीणीसोबत राहत होता. एकदा नदीकाठी पाणी प्यायला आलेल्या तीक्ष्णशृंगबैलाला पाहून कोल्हीण म्हणाली, हा एकटा बैल किती दिवस जगणार? जा, तू या बैलाचा पाठलाग कर. आता आपल्याला खायला चांगले मांस मिळेल. कोल्हा म्हणाला, " मला इथे बसू दे . इथे पाणी प्यायला आलेले उंदीर खाऊन आपण दोघेही आपली भूक भागवू. जे मिळू शकत नाही त्यामागं धावणं मूर्खपणाचं आहे.” कोल्हीण म्हणाली, “तू तर मला नशिबाने मिळालेल्या काही गोष्टींवर समाधान मानणारा आळशी वाटतोस . आळस सोडून पूर्ण लक्ष देऊन या बैलाचा पाठलाग केलास तर नक्की यश मिळेल. तू नाही गेलास तरी मी जाते." अशा प्रकारे समजावून सांगितल्यावर कोल्हा तयार झाला. कोल्हा बराच काळ बैलाचा पाठलाग करत होता, पण त्या बैलाची कोणीही आजपर्यंत शिकार करू शकलं नव्हतं . पंधरा वर्ष प्रयत्न केल्यावर कोल्हा आपल्या पत्नीला म्हणाला, "प्रिये ! तुझ्या सांगण्यावरून मी पंधरा वर्षांपासून या बैलाच्या मागे लागलो आहे, त्याला मारण्याची इच्छा आहे, पण हा बैल इतका शक्तिशाली आहे की मला ते शक्य होत नाहीये ." शेवटी, कोल्ह्याचं म्हणणं मान्य करून ते दोघेही बैलाचा नाद सोडून माघारी गेले.
    Show more Show less
    5 mins
  • "विणकराचे धन"
    Nov 24 2022
    सोमिलक नावाचा एक विणकर, जो एका गावात राहत होता, तो एक उच्च दर्जाचा कलाकार होता. तो राजांसाठी उत्तम कपडे विणत असे, पण तरीही तो सामान्य विणकरांइतका पैसा कमवू शकला नाही. आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे व्यथित होऊन एके दिवशी सोमिलक आपल्या पत्नीला म्हणाले, "प्रिये ! देवाची ही काय लीला आहे की सामान्य विणकरही माझ्यापेक्षा जास्त कमावतो. मला वाटते की कदाचित ही जागा माझ्यासाठी योग्य नाही, म्हणून मला दुसऱ्या ठिकाणी जाऊन माझे नशीब आजमावायचे आहे.” अर्थस्योपार्जनं कृत्वा नैव भोगं समश्नुते। अरण्यं महदासाद्य मूढः सोमिलको यथा॥ संपत्ती प्राप्त करूनही काही लोक त्याचा उपभोग घेऊ शकत नाहीत, पहा कशा प्रकारे मूर्ख सोमिलक भरपूर धन कमवूनही शेवटी गरीबच राहिला. सोमिलाकची बायको म्हणाली, “तुम्ही असा विचार करणं योग्य नाही. भलेही मेरू पर्वतावर जा किंवा मरुस्थलामध्ये राहायला जा, तुम्ही जिथे वाटेल तिथे जा परंतु एक लक्षात घ्या तुम्ही कमावलेल्या धनाचा तुम्ही योग्य वापर केला नाही तर ते धन निघून जाते. यासाठी मला वाटतं की तुम्ही तुमचं काम इथे राहूनच करावं. विणकर म्हणाला, "प्रिये ! मी तुझ्या मताशी सहमत नाही. कष्ट करून कोणीही आपले नशीब बदलू शकतो. म्हणूनच मी नक्कीच दुसऱ्या देशात जाईन." असा विचार करून सोमिलक दुसऱ्या शहरात गेला आणि अधिक कार्यक्षमतेने काम करू लागला . काही काळातच त्याने तीनशे सोन्याची नाणी कमावली. मग ती सोन्याची नाणी घेऊन तो आपल्या घराकडे निघाला. वाटेत सूर्यास्त झाल्यावर वन्य प्राण्यांपासून बचावासाठी तो झाडाच्या फांदीवर झोपला. मध्यरात्री त्याने भाग्य आणि पुरुषार्थ नावाच्या दोन व्यक्तींचे बोलणे ऐकले. भाग्य पुरुषार्थाला म्हणाला, जर तुला माहितीये की या विणकाराच्या नशिबात धन नाहीये तर तू त्याला तीनशे मुद्रा का देऊ केल्यास? पुरुषार्थ त्याला म्हणाला, मला त्याच्या कष्टाचं फळ त्याला मिळवून द्यायचं होतं याउपर तुला सगळंच माहीत आहे.
    Show more Show less
    9 mins

What listeners say about पंचतंत्रातील गोष्टी Panchatantratil Ghoshti

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.