Episodios

  • E16 - आनंदाचा प्रवास
    Jul 1 2023

    नवश्या मारुती ते सहकारनगर असा छोटासा प्रवास मला रोज चारवेळा करावा लागतो. आजुबाजूला बेदरकार गाडी चालवणारे, सतत चिडलेले, बारीकसारीक कारणांनी शिव्या देणारे व अत्यंत बेभरवशी लोक पसरलेले असतात. साहजीकच चिडचिड व त्रागा होत असे. पण यातून बाहेर पडण्याचा मार्ग मी शोधला व तोच तुमच्याशी शेअर करायचाय.


    #angermanagement #joy #littlejoy #vivekikatta #manachiyeguntee #traffic #roadrage #peace

    Más Menos
    12 m
  • E15 - अव्यक्त राग - ३ - कसा घालवायचा ?
    Jun 27 2023

    अव्यक्त राग किंवा passive aggression नक्की घालवायचं कसं याबददल चर्चा करु या आपल्या विवेकी कट्ट्याच्या 'मनाचिये गुंती' आजच्या या सदरात.


    #passiveaggression #angermanagement #vivekikatta #manachiyegunti #anger #expression

    Más Menos
    21 m
  • E14 - अव्यक्त राग - २ - नक्की कशामुळे येतो ?
    Jun 18 2023

    अव्यक्त राग किंवा passive aggression म्हणजे नक्की काय ते आपण गेल्या एपिसोडमधे समजून घेतलं. आता हे का निर्माण होतं, यामागची कारणं काय याबददल चर्चा करु या आपल्या विवेकी कट्ट्याच्या 'मनाचिये गुंती' आजच्या या सदरात.


    #passiveaggression #angermanagement #vivekikatta #manachiyegunti #anger #expression

    Más Menos
    12 m
  • E13 - अव्यक्त राग - १ - कसा ओळखायचा ?
    Jun 9 2023

    अव्यक्त राग किंवा passive aggression म्हणजे नक्की काय? ते कशाप्रकारे अनुभवायला मिळतं, कसं व्यक्त होतं याबददल चर्चा करु या आपल्या विवेकी कट्ट्याच्या 'मनाचिये गुंती' या सदरात.


    #passiveaggression #angermanagement #vivekikatta #manachiyegunti #anger #expression

    Más Menos
    12 m
  • E12 - शुद्ध आयुर्वेद चिकित्सक - वैद्य स्वराली
    Mar 30 2023

    आयुर्वेद म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ती पथ्यं आणि काढे. पण त्याच्याही पुढे जाऊन रोजच्या रोज अंगिकारता येणार आयुर्वेद शिकवतानाच, आयु्र्वेदाला निव्वळ एक जिवनशैली म्हणून मर्यादित न ठेवता एक चिकित्सापध्दती व अगदी सर्दी तापासारख्या तात्कालिक आजारांसाठीचा उपचार-पर्याय म्हणून समाजात स्थान मिळावं यासाठी विचार व प्रयत्न करणारी वैद्य स्वराली दामले-शेंड्ये


    #ayurved #talk #treatment

    Más Menos
    20 m
  • E11 - अनुवादातून सुसंवाद साधलेली सायली गोडसे
    Mar 21 2023

    आज आपण भेटत आहोत मूळची पत्रकार असलेली आणि आता पू्र्णवेळ अनुवादक म्हणून काम करणारी माझी मैत्रीण सायली गोडसे हिला. सायलीने आजवर जवळपास सत्तर पुस्तकांचा अनुवाद केला आहे. या प्रवासातले तिचे अनुभव ऐकू या 'अंतरीचा ज्ञानदिवा' या आपल्या सेगमेंट मधे.


    #interview #sayaligodse #translation #अनुवाद

    Más Menos
    31 m
  • E10 - टेन्शन कायकू आता है ?
    Feb 28 2023

    आजचा विषय आहे की परिक्षेच्या आधी आपल्याला टेन्शन का येतं ?


    - फेल होऊ याची भीती (फेल म्हणजे ??)

    - तयारीच झाली नसेल तर

    - चांगलंच करायचंय

    - अनिश्चितता

    - बाह्य दडपण (पालक)

    - सिध्द नव्हे युध्द

    आपण परिक्षेला व त्यापुढे जाऊन आपल्या स्वत:कडे कसे बघतो त्यावर आपल्या भावना अवलंबून आहेत


    #marathi #podcast #rational #thinking #anxiety #exam #tension 

    Más Menos
    11 m
  • E09 - स्वानंदाचे दार
    Feb 27 2023

    आज मराठी राजभाषा गौरव दिन... कवी कुसुमाग्रज यांची जयंती


    विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती

    म्हणुन नव्हती भीती तिजला पराजयाची


    जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली

    म्हणुन नाही खंतही तिजला मरावयाची 

    - कुसुमाग्रज


    या चार ओळींत काय नाही?

    कवीचा आपल्या कवितेवरचा, शब्दांवरचा, भाषेवरचा आणि त्यामधून मिळणार्‍या स्वानंदावरचा विश्वास तर आहेच... पण त्याहीपुढे जाऊन रोजच्या जगण्यात आपल्याला जखडून टाकणार्‍या कुंपणांना भेदणारी गुरुकिल्लीही आहे.

    लोक काय म्हणतील? माझं हसं झालं तर काय होईल? प्रयत्न करुनही मी अपयशी ठरलो तर? चार लोकांसमोर मला नीट बोलता आलं नाही तर? अशा अनेक प्रश्नांमुळे, अविवेकी समजांमुळे आपण भीती, नैराश्य, लाजाळूपणा, भिडस्तपणा आणि आत्मविश्वासाच्या अभावाला जवळ करतो.

    या चार ओळींमधला अर्थ समजून घेतला तर या भावनांना दूर करणे सहज शक्य होते. कुणावर विजय मिळवायचा, कुणासमोर आपली क्षमता सिध्द करायची, अमक्याने बरोबर म्हणले तरच आपण चांगले, चार लोकांना / समाजाला जे मान्य असते तेच योग्य... अशा अविवेकी विचारांनी आपल्या क्षमतांना आपण जखडून टाकतो, कुंपणं घालतो आणि इतरांनी चांगलं म्हणण्याची वाट बघत बसतो.

    जगात रत्नपारखी कमी आहेत... अस्सल हिरा अज्ञानी माणसाच्या हातात पडला तर तो त्याला दगडच वाटतो, म्हणून तो हिरा नसतो का? आपण काय आहोत ते आपल्यालाच समजत नसेल तर इतरांना आपली खरी ओळख कशी होणार? इकिगाई मधूनही हेच तर सांगीतले होते... स्वत:ला समजून घ्या, आपला प्रवास आपला मार्ग आपला वेग आपली पध्दत इतरांपेक्षा वेगळी आहे हे लवकरात लवकर डोक्यात जाऊ दे. मग इतरांबरोबर आपली नाहक तुलना करणे बंद होते आणि स्वानंदाचे दार खुले होते.


    Más Menos
    3 m