• Ashwini Bhide | 'जाई काजळ' प्रस्तुत मनDay with अनघा | Manaday with Anagha
    Jan 14 2024

    एक IAS ऑफिसर म्हणून विविध गावांची मने ओळखणाऱ्या, मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालिका म्हणून काम पाहणाऱ्या अश्विनी भिडे त्यांचे अनुभव मोकळेपणाने सांगतात. विविध किस्से सांगत त्या त्यांच्या जबाबदारीविषयी, निर्णयक्षमतेविषयी बोलतात. बघूया, मुंबई मेट्रोच्या घडणीत ज्यांचा सिंहाचा वाटा आहे त्या 'मेट्रो वूमन' अश्विनी भिडेंचा प्रवास या व्हिडीओ पॉडकास्टमध्ये!

    --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/manaday-with-anagha/message
    Show more Show less
    1 hr and 29 mins
  • Vaibhav Joshi | 'जाई काजळ' प्रस्तुत मनDay with अनघा | Manaday with Anagha
    Dec 31 2023

    सुप्रसिद्ध कवी आणि गीतकार वैभव जोशी यांच्याशी गप्पा मारताना गप्पांच्या ओघात त्यांच्याकडून त्यांच्या कुठेच प्रकाशित न झालेल्या कविता ऐकणं याहून वेगळी पर्वणी काय असू शकते! माणूस अनुभव आणि त्यामुळे होणाऱ्या संस्कारांनी घडत जातो. गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून कवी आणि गीतकार म्हणून यश मिळवणं हा प्रवास नक्कीच सोपा नाही. पण तरीही वैभव जोशी त्यांच्या प्रवासाला खडतर म्हणत नाहीत! कवीच्या आणि कवितेच्या यशाचा हा सुंदर प्रवास अनुभवूया वैभव जोशींसोबतच्या या व्हिडीओ पॉडकास्टमध्ये!

    --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/manaday-with-anagha/message
    Show more Show less
    1 hr and 35 mins
  • Kailash Katkar | 'जाई काजळ' प्रस्तुत मनDay with अनघा | Manaday with Anagha
    Dec 3 2023

    व्हायरसपासून संरक्षण किती महत्त्वाचे आहे हे जगाला कोव्हीडनंतर चांगलेच कळले आहे! गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या कॉम्प्युटरचे व्हायरसपासून रक्षण करणारे Quick Heal कसे निर्माण झाले, त्याची सुरुवात कशी झाली व मिळालेले यश त्यांनी कसे टिकवले याविषयी Quick Heal चे संस्थापक-CEO कैलाश काटकर सांगतात. कंपनीबरोबरच आयुष्यातील आव्हानांना सामोरं जाण्याविषयी त्यांच्या पत्नी अनुपमा काटकर सांगतात. कॅलक्युलेटरच्या दुरुस्तीपासून ते कॉम्प्युटरच्या तंदुरुस्तीपर्यंतचा त्यांचा प्रवास ते सांगत आहेत या व्हिडीओ पॉडकास्टमधून!

    --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/manaday-with-anagha/message
    Show more Show less
    1 hr and 40 mins
  • Vasudev Kamat | 'जाई काजळ' प्रस्तुत मनDay with अनघा- Season 3 - Ep 2 (part 1) | Manaday with Anagha
    Nov 19 2023

    रियाज' कलाकाराला जिवंत ठेवतो. मग कला कुठलीही असो! माणसाचं दृश्याबरोबर एक खोल नातं असतं. ते नातं जगविख्यात चित्रकार वासुदेव कामत चित्राच्या माध्यमाचा आधार घेत समजावून सांगतात. बालपणापासूनच त्यांच्या कलेचं चित्र कसं रेखाटलं गेलं ह्याविषयी ते दिलखुलास गप्पा मारतात. विविध किस्से, कथा यांतून ते त्यांची चित्रकार म्हणून झालेली घडण उलगडून सांगतात. कलाकाराच्या अंतरंगातली बैठक त्याच्या चित्रातून कशी व्यक्त होते हे वासुदेव कामत यांच्या व्हिडीओ पॉडकास्टमध्ये बघूया!

    --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/manaday-with-anagha/message
    Show more Show less
    1 hr and 23 mins
  • Vasudev Kamat | 'जाई काजळ' प्रस्तुत मनDay with अनघा- Season 3 - Ep 2 (part 2) | Manaday with Anagha
    Nov 19 2023

    नामवंत चित्रकार वासुदेव कामत त्यांच्या चंद्राच्या चित्राविषयी सांगतात. चित्रकला ही रेखाटन, रंग यांच्याही पलीकडे जाऊन केवळ एक कला नाही तर तत्त्वज्ञान आहे हे ते विविध उदाहरणांनी सहज समजावून सांगतात. अनघा बरोबरच्या या संवादात विविध किस्से, कथा यांतून ते तत्त्वज्ञान आणि कला यांचे सुंदर नाते कसे उलगडतात हे वासुदेव कामत यांच्या व्हिडीओ पॉडकास्ट भाग २ मध्ये बघूया!

    --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/manaday-with-anagha/message
    Show more Show less
    1 hr and 13 mins
  • Madhurani Gokhale Prabhulkar | 'जाई काजळ' प्रस्तुत मनDay with अनघा- Season 3 - Ep 1 | Manaday with Anagha
    Nov 6 2023

    आई कुठे काय करते?' मालिकेमधून 'अरुंधती'च्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली मधुराणी खऱ्या आयुष्यात अभिनेत्रीसोबतच कवयित्री, गायिका, संगीतकार आणि एक उत्तम रसिक आहे! 'आई' या भूमिकेविषयी बोलताना स्त्रीच्या भावनांचा पटच जणू ती उलगडते. लहानपणापासून लाभलेलं कलासक्त वातावरण, कलेविषयीचं प्रेम आणि उत्सुकता, जिद्दी वृत्ती याविषयी मधुराणी मोकळेपणाने सांगते. तिच्या मुलीशी असणाऱ्या तिच्या नात्याचे पैलूही ती उलगडते. या व्हिडीओ पॉडकास्टमध्ये बघूया कलाकार, माणूस आणि स्त्री म्हणून समृद्ध होण्याचा मधुराणीचा संवेदनशील प्रवास!


    #anaghamodak #madhuraniprabhulkar #arundhati #marathipodcast

    --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/manaday-with-anagha/message
    Show more Show less
    1 hr and 11 mins