• EP 8 : इंजिनीअर ते इन्फ्लुएन्सर शुभांगीचा सुरेल प्रवास
    Oct 22 2023
    आयआयटीची तयारी करताकरता शुभांगी केदार गाण्याकडे वळली. केवळ आवड असलेलं गाणं तिच्या करिअरची निवड बनलं. पण एकदा ठरवल्यानंतर मात्र शुभांगीने मागे वळून पाहिलं नाही. आपल्या आवाजाच्या जोरावर स्ट्रगल करत ही मुलगी सोशल मीडियाचा चेहरा बनली. गंमत म्हणून सुरू केलेलं यू ट्युब चॅनेल ते आजचा सोशल मीडिया इन्फ्लुए्सर असा प्रवास सांगते, गायिका शुभांगी केदार. सकाळ तनिष्का पॉडकास्टमध्ये. तिच्याशी गप्पा मारल्या आहेत, स्वाती केतकर-पंडित यांनी.
    Show more Show less
    26 mins
  • EP 7 : मूर्ती आणि मेकॅनिक्स दोन्हीत रस असणारी भूपाली निसळ
    Oct 21 2023
    इंजिनीअर तर अनेकजणी होतात पण त्या ज्ञानाचा वापर करून कारखाना उघडणाऱ्या फार कमी असतात. नगरची भूपाली निसळ त्यातलीच एक. मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या या मुलीचा मूर्तीशास्त्राचा अभ्याससुद्धा आहे, इतकंच नव्हे तर त्याविषयी दोन पुस्तकंही प्रकाशित झालीयेत. हे कमी की काय म्हणून ती तबला विशारद आहे आणि सामाजिक कामातही पुढे असते... नगरच्या भूपाली निसळचा हा बहुरंगी, बहुढंगी प्रवास ऐका, सकाळ पॉडकास्टमध्ये... संवाद साधला आहे, स्वाती केतकर-पंडित हिने
    Show more Show less
    32 mins
  • EP 6 : सॅनिटरी पॅडच्या माध्यमातून सामाजिक चळवळ घडवणाऱ्या स्वाती बेडेकर
    Oct 20 2023
    मूळच्या विज्ञान शिक्षिका असलेल्या स्वातीताई सॅनिटरी पॅड निर्मिती व्यवसायात तशा अपघातानेच उतरल्या पण त्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन सोडला नाही. उलट या दृष्टीकोनालाच साधन बनवून गुजरात, राजस्थान, हरियाणा इथल्या अगदी दुर्गम भागातल्या महिलांबरोबर त्यांनी मासिक पाळीविषयक शास्त्रीय माहितीची चळवळ उभारली. फक्त महिलाच नव्हेत तर या भागांतल्या पुरुषांनाही याविषयी माहिती देणाऱ्या बडोद्याच्या स्वाती बेडेकर या बेन विथ अ ब्रेन ठरल्या आहेत. त्याच्याशी गप्पा मारल्या आहेत, स्वाती केतकर-पंडित हिने
    Show more Show less
    30 mins
  • EP 5 : फॅशन इंडस्ट्रीत पाय रोवून उभं राहणारी मराठमोळी मुलगी वैशाली
    Oct 19 2023
    वयाच्या सतराव्या वर्षी काहीतरी करायचं म्हणून घरातून पळून गेलेली एक मुलगी मुंबईत येते. अगदी ५००रुपये महिना पगारापासून काम सुरु करते आणि आजच्या घडीला फॅशन इंडस्ट्रीत वैशाली एस नावाचा मोठा ब्रँड उभारते. सारंच अविश्वसनीय.. मुंबई ते मिलान असा संघर्षमय प्रवास सांगतेय, पैठणी, गजरे, खण यांना रॅम्पवर पहिल्यांदा घेऊन येणारी मराठमोळी फॅशन डिझायनर वैशाली शदांगुळे.सकाळ तनिष्का पॉडकास्टमध्ये तिच्याशी संवाद साधला आहे, स्वाती केतकर-पंडित यांनी.
    Show more Show less
    27 mins
  • EP 4 : आयर्नमॅन स्पर्धेत अव्वल ठरलेल्या पुणेकर सीएचा फिटनेस प्रवास
    Oct 18 2023
    व्यवसायाने बँकर,सीए असलेल्या सायली गंगाखेडकर यांनी आयर्न मॅनसारखी फिटनेस जगतातील अत्यंत मानाची समजली जाणारी स्पर्धा उत्तम टायमिंगसह पूर्ण केली. बाळंतपणात वाढलेलं वजन, मल्टीनॅशनलमधलं काम आणि घर याची सांगड सायलीने कशी घातली, तिचा हा फिटनेस प्रवास ऐकणार आहोत, आजच्या सकाळ तनिष्का पॉडाकास्टमध्ये.तब्बल २२ वर्षांनंतर सायलीने आपल्यातली फिटनेस फ्रीक मुलगी कशी बाहेर काढली, आयर्नमॅन शर्यतीसाठी सायकल चालवण्याबरोबरच ती दुरुस्त करण्याचंही ती कसं शिकली या सगळ्याबद्दल तिला बोलतं केलं आहे, स्वाती केतकर-पंडित यांनी
    Show more Show less
    31 mins
  • EP 3 : मुंबई पोलिसांचे ट्विटर हँडल सांभाळणारी जिगरबाज संचिका
    Oct 17 2023
    पोलिसांचं ट्विटर हँडल सांभाळताना कोणत्या अडचणी आल्या, कोणती आव्हानं होती. क्राइम रिपोर्टर ते पोलीसांच्या टिवटर हँडलला आकार देणारी एक सोशल मीडिया इंट्राप्रीन्युअर हा प्रवास उलगडून सांगते आहे, संचिका पांडे. तिच्याशी संवाद साधला आहे, स्वाती केतकर पंडित यांनी
    Show more Show less
    36 mins
  • EP 1 : आईवडिलांनी कलेकडे कसं पाहावं, हा दृष्टीकोन दिला. - स्वानंदी टिकेकर | Navratri Special Series
    Oct 15 2023
    गायिका आरती अंकलीकर-टिकेकर आणि अभिनेते उदय टिकेकर यांची लेक स्वानंदी हिला आईबाबा दोघांकडून गाणं आणि अभिनय दोन्हीचा वारसा मिळालाय. एलएलएम केलेली ही मुलगी कलाक्षेत्रात कशी आली? आईबाबांच्या नावाचा कितपत फायदा झाला, दडपण आलं या सगळ्याबद्दल स्वानंदीने धम्माल गप्पा मारल्या आहेत. आजीच्या आठवणीत आता एकटीने नवरात्र करणारी ही लेक... तिच्या पहिल्या ऑडीशनपासून तिच्या जोडीदाराच्या निवडीपर्यंत सगळ्या विषयांवर बोलली आहे. तिच्याशी संवाद साधला आहे, स्वाती केतकर-पंडित यांनी
    Show more Show less
    28 mins
  • EP 2 : JNU त शिकलेल्या मुंबईकर तरुणीचा Think Tank पर्यंतचा प्रवास
    Oct 14 2023
    आंतरराष्ट्रीय राजकारण आणि संबंध यांसारख्या क्लिष्ट आणि अभ्यासपूर्ण विषयातलं करिअर निवडणाऱ्या डॉ. रश्मिनी कोपरकर म्हणतात, अभ्यास केलात तर सगळं काही मिळेल. आपल्या कक्षा आपणच रुंदावायला हव्यात. जेएनयूसारख्या प्रतिष्ठेच्या विद्यापीठातील विद्यार्थी आणि शिक्षक अशा दोन्ही बाजूंचा सुंदर अनुभव, देशपरदेशांचा अभ्यास, पर्यटनाची आवड या सगळ्याविषयी डॉ. रश्मिनी कोपरकर यांच्याशी संवाद साधला आहे, स्वाती केतकर-पंडित यांनी सकाळ तनिष्का पॉडकास्टमध्ये
    Show more Show less
    32 mins