Episodios

  • # 1532: स्वप्नातून संदेश. लेखक : सुजाता लेले. कथन : ( मीनल भडसावळे )
    Jul 28 2024

    ही गोष्ट एका छोट्या मुलाच्या स्वप्नाची आहे. दिवसेंदिवस कमी होणारी जंगले ,त्यामुळे होणारा पाणी-साठ्यावर परिणाम .तसेच प्राणी, पक्षी यांना बंदिस्त ठेऊ नये हा संदेश ह्या गोष्टीतून मिळतो.

    Más Menos
    4 m
  • # 1531: गुरू वचन त्रिकाल सत्य. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Jul 28 2024

    गुरूजींनी धन न देता फक्त सल्ला दिला तोही धामधूमीत लग्न करण्याचा. इथं तर साधा मंडप घालायची पंचाईत. राहून राहून ते डाळींबाचं गाठोडं त्याला सतावत होतं अखेर त्याने विचार केला की हे गाठोडं सकाळीच गावाबाहेर लांब कुठेतरी नदीपात्रात फेकून द्यायचं. सकाळचा चहापाणी ऊरकून चंदन आपल्या सहकाऱ्यांची नजर चुकवून गाठोड्यासह घराबाहेर पडला. गावाबाहेर वेशीजवळ चौकात गर्दी पाहून तो जरा थांबला.
    तिथल्या जवळच्या एका प्रांताच्या राजाचा सेवक दंवंडी देत होता की, ‘या दुष्काळाच्या परिस्थितीतही जो कूणी आमच्या महाराजांना पिकलेली डाळींब आणून देईल त्याला मागेल ते बक्षीस महाराजांकडून मिळेल.‘

    Más Menos
    8 m
  • # 1530: कारगिल हिरो: कॅप्टन विक्रम बत्रा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Jul 26 2024

    “पाकिस्तानी हेवी मशीन गनच्या संततधार पावसासारख्या गोळ्या बरसल्या. आपल्या मुलाने तो गोळीबार चुकवत पाकिस्तानी बंकर गाठला आणि ग्रेनेडची पिन काढून तो थेट बंकरमध्ये टाकला व तेरा पाकिस्तानी सैनिकांना यमसदनाला पाठवले. हेवी मशीन गन मधून गोळ्यांचा वर्षाव बंद झाला आणि ते क्षेत्र आमच्या नियंत्रणाखाली आले.”
    “सर्वप्रथम तुमच्या मुलाचे शरीर उचलून बाहेर आणणारी मी पहिली व्यक्ती आहे. सर, त्याच्या शरीरात बेचाळीस गोळ्या घुसल्या होत्या. सर, मी त्याचे डोके हातात धरले त्यानंतरच त्याने शेवटचा श्वास घेतला."

    Más Menos
    9 m
  • # 1529: कथा पहिल्या गुरूपौर्णिमेची. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Jul 26 2024

    पण केवळ सात माणसे तेथे थांबून राहिली. या आदियोगीकडून ज्ञान ग्रहण करण्यासाठी ती सात माणसे आग्रही होती. पण आदियोगींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्या सात जणांनी प्रार्थना केली, ''जे गुह्य ज्ञान आपल्याला प्राप्त झाले आहे, ते आम्हालाही प्राप्त करण्याची इच्छा आहे.'' त्यांची विनवणी धुडकावून लावत आदियोगी गरजले, ''मूढमतींनो, तुम्ही आज ज्या अवस्थेत आहात त्यावरून हे स्पष्ट होतं की लाखो वर्षांमध्येही तुम्हाला ज्ञानप्राप्ती होणं अशक्य आहे. हे प्राप्त करण्यासाठी तुम्हाला कठोर तपस्या करण्याची आवश्यकता आहे. हा काही पोरखेळ किंवा मनोरंजन नव्हे.''

    Más Menos
    8 m
  • # 1528: कहाणी 'हायवे टच' घराची. लेखक : शेखर गायकवाड. कथन : (प्रा. सौ. अनुराधाभडसावळे. )
    Jul 24 2024

    जगात सहसा कुठेही आपले राहते घर हायवे जवळ बांधले जात नाही. पण आपल्याकडे मात्र भर रस्त्यावर असलेले घर ही बाब अभिमानाने सांगितली जाते. सरकारी जमिनीत अतिक्रमण करुन हायवे लगत बांधलेल्या घराची ही कहाणी!

    Más Menos
    6 m
  • # 1527: "जा, कुणाला तरी मदत करून या!" कथन : (प्रा. सौ.. अनुराधा भडसावळे. )
    Jul 23 2024

    आता तुमच्या लक्षात आले असेल *मदत करण्यासाठी तुमची निवड व्हावी लागते.* कुणी ही मदत करू शकत नाही ,मदत तीच व्यक्ती करते ज्याची परमेश्वराने निवड केलेली असते.

    Más Menos
    4 m
  • # 1526: अवयवांची सभा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Jul 23 2024

    पायानी त्यांची कशी पायमल्ली चालली आहे याचा पाढाच वाचला : माझा तर उपयोग नेमका चालण्यासाठी आहे का गाडींचे क्लच आणि ब्रेक दाबण्यासाठी आहे, हेच समजत नाही. दिवसाकाठी थोडेही चालत नाही हा माणूस. जरा कुठं मोकळं व्हावं म्हटले की हा मटकन बसतो जाग्यावर. घरात सोफ्यावर बसतो, बाहेर जाताना गाडीत बसतो, ऑफिसात खुर्चीवर बसतो आणि घरी आल्यावर बेडवर झोपतो. माझी तर चालायची सवयच मोडली आहे. किती वर्ष झाली मी तळपायाची जाड त्वचा जमिनीला टेकवलेलीच नाही. मातीशी संपर्क येऊन कित्येक महिने लोटलेत.

    Más Menos
    10 m
  • # 1525: चिंटी चावल ले चली. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Jul 17 2024

    मुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, 'वा वा ... क्या बात है। देवा! तू भाताची सोय तर केलीच होती, आता वरणाचीही सोय झाली.' पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली.
    तेव्हा कबीर म्हणाले, 'वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार.'

    Más Menos
    4 m