Episodes

  • # 1529: कथा पहिल्या गुरूपौर्णिमेची. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Jul 26 2024

    पण केवळ सात माणसे तेथे थांबून राहिली. या आदियोगीकडून ज्ञान ग्रहण करण्यासाठी ती सात माणसे आग्रही होती. पण आदियोगींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्या सात जणांनी प्रार्थना केली, ''जे गुह्य ज्ञान आपल्याला प्राप्त झाले आहे, ते आम्हालाही प्राप्त करण्याची इच्छा आहे.'' त्यांची विनवणी धुडकावून लावत आदियोगी गरजले, ''मूढमतींनो, तुम्ही आज ज्या अवस्थेत आहात त्यावरून हे स्पष्ट होतं की लाखो वर्षांमध्येही तुम्हाला ज्ञानप्राप्ती होणं अशक्य आहे. हे प्राप्त करण्यासाठी तुम्हाला कठोर तपस्या करण्याची आवश्यकता आहे. हा काही पोरखेळ किंवा मनोरंजन नव्हे.''

    Show more Show less
    8 mins
  • # 1528: कहाणी 'हायवे टच' घराची. लेखक : शेखर गायकवाड. कथन : (प्रा. सौ. अनुराधाभडसावळे. )
    Jul 24 2024

    जगात सहसा कुठेही आपले राहते घर हायवे जवळ बांधले जात नाही. पण आपल्याकडे मात्र भर रस्त्यावर असलेले घर ही बाब अभिमानाने सांगितली जाते. सरकारी जमिनीत अतिक्रमण करुन हायवे लगत बांधलेल्या घराची ही कहाणी!

    Show more Show less
    6 mins
  • # 1527: "जा, कुणाला तरी मदत करून या!" कथन : (प्रा. सौ.. अनुराधा भडसावळे. )
    Jul 23 2024

    आता तुमच्या लक्षात आले असेल *मदत करण्यासाठी तुमची निवड व्हावी लागते.* कुणी ही मदत करू शकत नाही ,मदत तीच व्यक्ती करते ज्याची परमेश्वराने निवड केलेली असते.

    Show more Show less
    4 mins
  • # 1526: अवयवांची सभा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Jul 23 2024

    पायानी त्यांची कशी पायमल्ली चालली आहे याचा पाढाच वाचला : माझा तर उपयोग नेमका चालण्यासाठी आहे का गाडींचे क्लच आणि ब्रेक दाबण्यासाठी आहे, हेच समजत नाही. दिवसाकाठी थोडेही चालत नाही हा माणूस. जरा कुठं मोकळं व्हावं म्हटले की हा मटकन बसतो जाग्यावर. घरात सोफ्यावर बसतो, बाहेर जाताना गाडीत बसतो, ऑफिसात खुर्चीवर बसतो आणि घरी आल्यावर बेडवर झोपतो. माझी तर चालायची सवयच मोडली आहे. किती वर्ष झाली मी तळपायाची जाड त्वचा जमिनीला टेकवलेलीच नाही. मातीशी संपर्क येऊन कित्येक महिने लोटलेत.

    Show more Show less
    10 mins
  • # 1525: चिंटी चावल ले चली. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Jul 17 2024

    मुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, 'वा वा ... क्या बात है। देवा! तू भाताची सोय तर केलीच होती, आता वरणाचीही सोय झाली.' पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली.
    तेव्हा कबीर म्हणाले, 'वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार.'

    Show more Show less
    4 mins
  • 1524: उचल्या भक्ताने विठ्ठलाला लुटले . ( प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Jul 17 2024

    “अरे बाबा, आम्हालाही घेऊ दे की त्यांचे दर्शन! अरे, हे तीर्थयात्रेला गेल्यापासून नामयाचे कीर्तन नाही ऐकलं बरेच दिवसात. ज्ञानोबा माऊली दिसली नाही. आम्ही त्यांचं लांबून दर्शन घेऊ. बोलणार सुद्धा नाही त्यांच्याशी. आम्ही पिकली पान! वरती जाण्यापूर्वी संतांचे दर्शन घ्यावं म्हणतो! ” .. देव.

    देवाने हरीपाळाला जवळ घेतले. पाठीवरून हात फिरवला आणि उद्गारले, “हरिपाळl, साधुसंतांचा आदर करायचा हे तुला कळते. मोठा पुण्यवान आहेस तू. आज तुझे भाग्य खरोखर उजळले आहे. संतांच्या सेवेमुळे प्रत्यक्ष विठोबा रखुमाई यांच्या दर्शनाचा लाभ तुला झाला आहे”.

    हरीपाळाच्या उद्धाराचे कारण होते त्याची भक्ती!


    Show more Show less
    11 mins
  • # 1523: शठे शाठ्यं समाचरेत्.. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Jul 14 2024

    मध्यरात्री कन्नौजच्या एक चतुर्थांश सैन्याने तक्षकाच्या नेतृत्वाखाली अरब छावणीवर हल्ला केला. सर्वजण झोपून विश्रांती घेत होते. महंमद बिन तुघलकाला अशी अपेक्षा नव्हती की एखादा हिंदू राजा प्रतिष्ठेचे उल्लंघन करून आणि शाश्वत नियम बाजूला ठेवून अशा प्रकारे आक्रमण करेल. सकाळपर्यंत दोन तृतीयांश अरब सैन्य मारले गेले होते. उरलेली फौज मागे धावायला लागली. ते मागे पळाले तेव्हा त्यांनी बघितलं की महाराज नाग भट्ट त्यांच्या बाकीच्या सैन्यासह तिथे उभे होते. त्यांनी तुघलकाच्या सैन्याचा नायनाट केला.
    या घटनेनंतर, तीन शतके म्हणजे 300 वर्षे, अरबांनी कनौज किंवा भारताकडे पाहण्याची हिंमत केली नाही.

    Show more Show less
    8 mins
  • # 1522: कोण गोंदवलेकर...? ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Jul 13 2024

    मला सांगा. आपल्याला गोंदवलेकर महाराज कोण, श्री स्वामी समर्थ कोण, साईबाबा कोण, गजानन महाराज कोण हे माहीत आहे. त्यांचे चमत्कार, त्यांचा बोध सारं माहीत आहे. तरी आपल्यात पालट होत नाही .....
    आणि त्यांचं नाव-गाव काही माहीत नसताना केवळ त्यांच्यावरच्या निस्सीम प्रेमामुळेही अंतरंगातून बोध होत जातो आणि त्यानं जीवनाला कलाटणी मिळते, ते पूर्ण पालटू शकतं! याचं या इतकं दुसरं उदाहरण माझ्या तरी पाहण्यात नाही.
    त्या टपरीला भेट दिली तेव्हा त्या टपरीत आणि त्या चहावाल्याच्या डोळ्यात मला गोंदवल्याच्या महाराजांच्या दर्शनाचंच समाधान मिळालं.

    Show more Show less
    7 mins